बालपण
बालपण
1 min
88
ते नदीतल पोहण
वाऱ्यावरती फिरण
काटयाच भिरभिर
सूर्य डुबताना पाहण
वडाच्या सुरपारंब्या
बर्फ पाणीची मजा
ते मातीचे किल्ले
तो वाळूचा खोपा
ती आजीची गोष्ट
बाबाची शाबासकी
तो मामाचा गाव
लपडांवचा डाव
चिंचोक्याची चमफूल
सापसीडीचा गोतावळा
विटीदांडूची मजा
लिमलेटच्या गोळ्या
हरवत चालले बालपण
भविष्यकाळ दुःखाचा
तो बालपणीचा काळ
खरच होता सुखाचा
