STORYMIRROR

SWATI WAKTE

Others

4  

SWATI WAKTE

Others

बालपण

बालपण

1 min
410

माझे बालपण म्हणजे खुप धमाल 

नव्हता लॅपटॉप नव्हता मोबाईल 

फक्त होती मौज मजा 

मैदानी खेळाची मजा 


घरी यायचे खुप पाहुणे 

सारखी असायची त्यांना मेजवानी

त्यांच्या सोबत रात्रभर गप्पा गाणी 

मौज मजा धमाल आणि 


टीव्ही वर होते चॅनेल कमी 

रात्रभर व्ही सी आर बघत होतो आम्ही 

एकजुटीने राहत होतो शेजारी शेजारी 

माहिती नव्हते आम्हाला काय असते होणे बोर 


आमचा आम्ही करायचो अभ्यास 

आई बाबा नाही भरवायचे घास 

नवीन वस्तूचे आम्हाला खुप होते नवल 

सर्व गोष्टींचे खुप खुप कुतूहल 


हल्लीची मुले पारखे ह्या सर्वाना 

नाही कशाचे नवल त्यांना 

हरविले त्यांचे हसणे 

नाही मिळत ते पैशाने 


Rate this content
Log in