बालपण
बालपण
1 min
412
मोकळे आकाश होते
मला नव्हते काही उणे
आठतात ते बालपणीचे
स्वच्छंदी दिवस जुणे
बोबड्या माझ्या बोलाने
अंगण आमचे खुलायचे
नाजूक अश्या पावलाने
अख्खं घर फुलायचे
नव्हती कुणाची भीती
नव्हता कुणाचा धाक
लाडाच्या भोवऱ्यात
होता प्रेमाचा मिलाप
पतंग उडवताना तेव्हा
खूपच मजा यायची
पहिल्या पावसात कागदाची
होडी जेव्हा पाण्यात तरंगायची
आता हरवले बालपण
कार्टून, व्हिडिओ गेम च्या जगात
दुर्मीळ झाली होडी, पतंग
गुगलच्या युगात
