Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Padmakar Bhave

Others

2  

Padmakar Bhave

Others

बालपण कुठले?

बालपण कुठले?

1 min
37


आज परत मान वळवतांना

दिसतात धुक्यात लपलेले अस्पष्ट क्षणांचे दवबिंदू !

अगदी स्पष्टपणे !

निंबोणीच्या फांदीला बांधलेला झोका,

हेलकवा केवढा तो....

आता फक्त झुलतोय मनहिंदोळा

आई ने घातलेली हाक

आणि तत्क्षणी झोक्यावरून मारलेली

टुणकन उडी....

मूठभर मिळालेले गूळ शेंगदाणे,

केवढी श्रीमंती त्या मुठीत !

केवढी रीती झालीय आता मूठ...

सवाष्ण अन्नपूर्णा सदैव नांदते तरी !

नव्या हातरुमालाचाही आनंद

सहस्त्र मुठीत न मावणारा !

अंगभर चिकटलेले असतात 

वँन हुसेन...लुईस फिलिप...

अँलन सॉलि.... पार्क अव्हेन्यू आणि काय काय

पण नागडेपण काही झाकलं जात नाही !


Rate this content
Log in