बालकदिन(१४/११/२०१९)
बालकदिन(१४/११/२०१९)
बालपणचं बरं होतं,
'आनंद' नि 'दुःख' तेव्हा कळतंच नव्हतं...
'अपेक्षाभंग' होणं काय असतं
हे कधी कोणी जाणवूनचं दिल नव्हतं...!!१!!
बालपण संपल तसं
सगळंच हरवून गेलं...
'आदर' द्यायचा नि 'माघार' घ्यायची
हेच ताटात येत गेलं...!!२!!
आता 'दुःख' जरी झालं तरी
रडता येत नाही,
आणि आनंदात मनसोक्त
उडया ही मारता येत नाही...!!३!!
सगळं कसं
'लक्ष्मण' रेषेसारखं झालं आहे...
त्याच्या बाहेर पाऊल पडलं की
जगणंच कठीण होत आहे...!!४!!
बालपणाच 'निरागस' मनच बरं होतं
'स्वाभिमान' नि 'अहंकार' हे त्यात येतंच नव्हतं...
आज सगळं काही या दोन गोष्टींनी ताब्यात घेतलं आहे
जर यात पाऊल नीट पडलं तर ठीक
नाहीतर जीवनचं 'व्यर्थ' वाटतं आहे...!!५!!
