STORYMIRROR

Vasudha Naik

Others

4  

Vasudha Naik

Others

बालगीत

बालगीत

1 min
176

बंडूची लाल बंडी

आईने मस्त धुतली

ती वाळत घातली

वार्‍याने ती उडाली.....


बंडी उडून पळाली

उंच उंच वर वर गेली

खांबाला ती अडकली

बंडूला फार मजा आली.....


आई बंडूला रागावली

"अरे,पाहतोस काय?"

पळ त्या मागे लवकर

नाहीतर ती मिळणार नाय.....


बंडू बंडीमागे धावला

काठी त्याच्या सोबतीला

काठीने बंडूने बंडी काढली 

आई होती मागे दिमतीला....


 झाली फजिती बंडूच्या बंडीची

आईने मग परत बंडी धुतली

बंडीला आता चिमटा लावला

आता बंडी वार्‍याने नाही उडाली.....


साहित्याला गुण द्या
लॉग इन