बाळाचे दोस्त
बाळाचे दोस्त
1 min
398
ये गं ये गं
हम्माराणी
बाळ देई
चारापाणी.
🐄🐄🐄
म्याँव म्याँव
मनी करी
डोळा तिचा
दुधावरी.
🐱🐱🐱
भों भों मोती
अंगणात
खेळे कसा
रिंगणात.
🐶🐶🐶
चिवचिव
चिऊताई
बाळाचाच
खाऊ खाई.
🐤🐤🐤
मिठू मिठू
बोले राघू
टकामका
नको बघू.
🦜🦜🦜
थुई थुई
नाच मोरा
न्यारा बाई
तुझा तोरा.
🦚🦚🦚
कावकाव
काऊ करी
बस उगा
झाडावरी.
🐧🐧🐧
या हो या हो
मैनाताई
गोड गाणी
गा ना बाई.
🐦🐦🐦
या रे सारे
खेळायला
बाळ आले
शिवायला.
👼🏻👼🏻👼🏻
आली आली
सांज आली
झोपायाची
वेळ झाली.
🌚🌚🌚
करू आता
गाई गाई
बाळ माझे
झोपी जाई.
