STORYMIRROR

Vasudha Naik

Others

4  

Vasudha Naik

Others

बाल प्रार्थना

बाल प्रार्थना

1 min
1.0K

या लाडक्या मुलांनो

शाळेत लवकर या

प्रार्थनेला तुम्ही हजर रहा

शाळेत मुलांनो या...


प्रार्थनेला हात जोडा

पसायदान ते म्हणा

प्रतिज्ञेतून तुम्ही मुलांनो

एकजूट ती जाणा...


वर्गात नीट वागा

अभ्यास छान करा

शिस्तही छान पाळा

वाईटास नको थारा....


उपक्रम तेही करा

प्रकल्पात रस घ्यावा

गृहपाठ नित्य करा

मैदानी खेळ खेळावा...


फळ्यावरचे पाहून

तुम्ही पाटीवर लिहा

गाणीही गोड म्हणा

चित्रेही छान पाहा...


गप्पा नका मारू

पुस्तकातील घ्यावे ज्ञान

वाचन तयांचे करूनी

जगात मिळवू मोठा मान...


साहित्याला गुण द्या
लॉग इन