बाजत गाजत बाप्पा आले घरात
बाजत गाजत बाप्पा आले घरात
1 min
225
गजमुख गणराया वंदितो तुम्हाला
एक महिन्यापासून हुरहूर चालू होती मनात
आतुरता होती तुझ्याच आगमनाची आम्हा सर्वांला
वाजत गाजत बाप्पा आले घरात
तुझ्याच आगमनाने नटली निसर्गसृष्टी
वातावरण झाले मंगलमय असूनही रोगराई
पाहता रूप तुझे नाहून निघाली माझी दृष्टी
आशा करतो बाप्पा तुमच्या शक्तीने रोगराई ही पळून जाई
तुझ्या आरतीमध्ये ताकद अनोखी झुंजण्यासाठी प्रत्येकी संकटांना
मोदकाची लगभग चालू झाली प्रत्येक घरात
बाप्पा तुझ्याच आगमनाने आनंद झाला सर्वांना
वाजत गाजत बाप्पा आले घरात
