बाजार अनोखा
बाजार अनोखा
1 min
191
गोठ्यात वासरांच्या का गाय हंबरेना?
शहरात माणसांच्या गोठाच सापडेना!
नाही पत्ता कुणाला शेजार तो कुणाचा,
माणूस माणसाला अजिबात ओळखेना!
मी पाहिले गडे हो प्राण्यास त्या मुक्याही,
ते जीव लावती बघ का माणसा कळेना?
हल्ली विचारती बघ घेणार का चहा हो?
त्या आग्रहीपणाचा लवलेशही दिसेना!
पडताच काम थोडे दाढीस घोटती बघ,
का कोडगेपणा हा कोणास टाकवेना?
स्वार्थात ठार वेडा जो तो हुशार झाला,
जातो पुढे कुणी तर कोणास सोसवेना!
झाला पुरे गडे हो बाजार हा अनोखा,
'जय' सांगतो मनोमन हे दृश्य पाहवेना!
