STORYMIRROR

Priti Dabade

Others Children

4  

Priti Dabade

Others Children

बाहुली

बाहुली

1 min
181

बाहुली माझी छान

गोरी गोरी पान


बाहुलीचे केस चमकदार

छबी तिची दमदार


बाहुलीचा झगा जाळीदार

चाल कशी डौलदार


बाहुलीचे डोळे पाणीदार

ओठ लाल चुटुकदार


बाहुली वाटे बोलकी

नाचे वाजता ढोलकी


ती फुगा खेळते

साऱ्यांचा वेळ घालवते


बाहुलीचे गुलाबी गाल 

रागवता होई लाल


साहित्याला गुण द्या
लॉग इन