बाधा
बाधा
1 min
227
लाज वाटते ज्यांना इतिहासाची भविष्य नाही त्यांना
युद्धाच्या छायेखाली वावरताना आयुष्य नाही त्यांना
गर्व करावा ज्याचा वारसा तसा सहज नाही त्यांना
केला विकृत वसा बेरंग झाला पावन नाही त्यांना
पथभ्रष्ट अखेरचा ठरेल ओळख निनावी त्यांना
घराण्याचा दुवा हरविलेला शिक्का तो बसेल त्यांना
पुढे ठेवावे चालू मागचे धडे स्वारस्य नाही त्यांना
अनाकलनीय वर्तन वाटते रहस्य नाही त्यांना
विचलित करिती विषाक्त फसव्या प्रचाराने त्यांना
दूषित दृष्टीकोन भलते मंथन बिथरवी त्यांना
