बाबा
बाबा
1 min
278
बाबांचं काळीज म्हणजे जणू शहाळं
बाहेरून कठोर अन् आतून निर्मळ
किती ही ओरडले अन् रागावले तरी
असतो त्यांचाही जीव आपल्या लेकरांवरी
कष्ट करुन आयुष्यभर नाही लागू देत दुःखाची झळ
पाहण्यासाठी लेकरांना सुखात असते त्यांची तळमळ
बाबा बनणं सोपं नाही काही
लेकरांची काळजी नीट जगूही देत नाही
कुटुंबासाठी त्यांनी आयुष्य सारं वेचलं
कर्तव्यापायी स्वतःच्या स्वप्नांना त्यांनी ठेचलं
केला नाही कधी त्यांनी स्वतःचा विचार
बाबाच असतात कुटुंबाचा खंबीर आधार
