STORYMIRROR

Nurjahan Shaikh

Others

3  

Nurjahan Shaikh

Others

बाबा माझा महान

बाबा माझा महान

1 min
221

बाबा आमचा लाडका 

कर्ता कर्ते घरातला,

धाक जरी त्यांचा खूप 

गोड शब्द प्रेमातला..१.. 


शिस्त आम्हा अंगी लावी 

ज्ञान धडे सर्वां देई, 

हवे नको सारे पाही 

संरक्षक दाता होई..२.. 


समाजात वागण्यास 

बाबा आम्हा शिकवतो, 

कसे लढावे जगाशी 

बाबा स्वतः दाखवतो..३.. 


बाबा मुलांचा कवच 

ढाल बनून राहतो,

येता कोणते संकट 

अन्यायाशी झगडतो..४.. 


त्याचा नुसता आधार 

देई बळ जगण्यास, 

बाबा आहेच महान 

पूर्ण करे कुटुंबास..५..


Rate this content
Log in