STORYMIRROR

Varsha Shidore

Others

4  

Varsha Shidore

Others

बाबा काहीतरी सांगायचंय...

बाबा काहीतरी सांगायचंय...

1 min
323

तुमच्या स्वप्नाळू परीला 

कोणताच नाही ओ त्रास 

मानसन्मानाचा विनाकारण 

घातलेला नाही कोणीच घाट

जीवनाच्या आशांवर निर्विवाद 

तुमचा प्रत्येक शब्द जणू आशीर्वाद 

तुमच्या कष्टाचं नाही ऋण फेडायचं 

ते शक्य नाही सगळं आयुष्य जरी झुरलं 

ओरडण्यात तुमच्या दिसत असते काळजी 

आईच्या कुरकुरण्यात मिळते साथ तुमची

दुर्लक्ष कधी तुमच्याकडे माझ्याच व्यापात होतं 

आठवणीने आठवण फक्त तुम्हालाच तेव्हा येते 

पण बाबा मला काहीतरी सांगायचंय...बोलायचंय 

सर्वात आवडता हिरो फक्त तुम्हीच ओ राहणार बाबा 

आतापर्यंतच्या प्रत्येक निर्णयात फक्त होकार भरलास 

पुढेही अशीच मिळेल होकाराची साथ एवढंच हवं मला 

स्वातंत्र्य बोलायचं निवडीचं दिलंत आता काळजी सोडा 

परीला तुमच्या स्वतःच्या हातात सत्ता तर देऊन पाहा 

आजपर्यंत सगळं सांभाळलं तुमच्या खांद्याला खांदा देऊन 

आता फक्त पाठीवर हात ठेऊन धाव म्हणून तर पाहा

तुमच्या कष्टाला जागण्याची एक संधी तर देऊन पाहा 

मुलांपेक्षा मुलीला जपणारा तुमच्या सारखा बाबा 

नक्कीच सर्वात नशीबवान आहे रे मी बाबा 

कोणाच्याच विरोधाला तूम्ही कधीच नाही पडला बळी

मुलीच्या पाठीशी खंबीरपणे नेहमीच राहिले उभे 


Rate this content
Log in