|| अवघे सुख ||
|| अवघे सुख ||
1 min
57
तेथ रम्य रम्य सुख
लाभतो धीर स्पर्श …
स्नेहबंध आलिंगण
पवित्र ते अंगण ||
मंत्र मुग्ध ती साद
तहान तृप्त मायेची...
निशब्द त्या लोचनास
दुःखास हळद साजेशी ||
चांदण्यांची लुकलुक चंदेरी
अंगाई रात्रीस सुखावे ...
जीवास बिनघोर निद्रा
थापडीने चांदोबास लाजवावे ||
ब्रह्म दिव्य अवघडतो
शून्य शून्य शब्दसंपदा ...
त्रिभुवनाचे अवघे सुख
मातृत्वास नमला माथा ||