औंदा मतदान करायचं
औंदा मतदान करायचं
1 min
511
औंदा मतदान करायचं
लोकसभेचं आलयं वारं
नेते फिरती भिरभिर भिरं
पसंदीचा उमेदवार निवडायचं
औंदा मतदान करायचं
मला औंदा मतदान करायचं .....
गावात समद्याना समजून सांगणार
मी कोणच्या गावाला नाही जाणार
लोकशाही मजबूत करायचं
मला औंदा मतदान करायचं
मतदान केंद्र आहे घराजवळ
मतदान करण्यास काढूया वेळ
साऱ्या लोकांना हेच सांगायचं
मला औंदा मतदान करायचं
पैसा घेऊ नको एका वोटापायी
नको इज्जत घालवू नोटापायी
चांगला सक्षम नेता निवडायचं
मला औंदा मतदान करायचं
