अतूट प्रीती
अतूट प्रीती
1 min
350
उतरून तळ्यात आज,
चंद्र न्हाऊन गेला,
मिसळून रंग आपुला,
चंद्र विसरून गेला,
वेडे तळे मंत्रमुग्ध,
सुखावले कंपनाने,
पाण्यातील शहारे,
अमूभवले तरंगाने,
चमचम करी मासोळी,
घेते हळूच उसळी,
वाऱ्याशी होता सलगी,
सुलकन दूर पळाली,
एक हंस आणि हंसिनी,
स्वच्छनदे विहार करती,
आकाशी चंद्र पाहतो,
तळ्यातील अतूट प्रीती,
आकाशी चंद्र पाहतो,
तळ्यातील अतूट प्रीती ।।
