अट्टाहास
अट्टाहास
1 min
173
मी अट्टाहास नाही करत
शब्दांना वृत्तात आणि
अलंकारात बांधण्याचा.....
मी त्यांना जळू देते
आपल्यातच......
फिनिक्स पक्षा प्रमाणे
मग उडतात ते .....
आपल्याच
राखेतून सोनेरी होऊन
*मुक्तछंदात*
आणि भावतात
अनंत काळापर्यंत
मनावर एक अमिट,
अविरत छाप सोडत.