STORYMIRROR

Prashant Kadam

Others

4  

Prashant Kadam

Others

अट्टाहास

अट्टाहास

1 min
363

अट्टाहास असावा 

नेहमीच सुंदर दिसण्याचा

नवेनवे कपडे घालून

नटूनथटून मुरडण्याचा

नियमित व्यायाम करून

शरीराने सक्षम असण्याचा


अट्टाहास असावा 

नीटनेटकेपणाचा

अचूक प्रसाधन वापरून

सौंदर्यात भर घालण्याचा

टापटीप राहून

सदैव प्रसन्न राहण्याचा


अट्टाहास असावा

वक्तशीरपणाचा

योग्य नियोजन ठेवून

कामे पूर्ण करण्याचा

क्षणाची किंमत ओळखून

वेळेचा सदुपयोग करण्याचा


अट्टाहास असावा 

प्रामाणिकपणाचा

विचार असावा मनात

सचोटी व नितीमत्तेचा

सत्याची कास धरून

सात्विक सदाचारी होण्याचा


अट्टाहास असावा

समंजसपणाचा

परोपकाराची साथ घेऊन

नव्या वाटेवर चालण्याचा

भेदभाव दूर सारून

सुशील माणूसकी जपण्याचा


अट्टाहास असावा

निरागसतेचा

मृदू मुलायम भाषेत

सुसंवाद साधण्याचा 

प्रेमळ अल्लड बालपणात

पुन्हा पुन्हा रमण्याचा 


अट्टाहास असावा

देशभक्तीचा

राष्ट्रवीरांचे स्मरण करून

त्यांचे पोवाडे गाण्याचा

मातृभूमीचे ऋण ओळखून

देशासाठी समर्पण देण्याचा 


Rate this content
Log in