Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Deepa Vankudre

Others

4.0  

Deepa Vankudre

Others

अत्त दीपो भवः

अत्त दीपो भवः

1 min
304


लक्ष लक्ष तारे उजळवू या धरतीवर

मंदमंद ज्योती तेववू या पणतीवर,


'अत्त दीप भवः', मनी मंत्र धरू खरा,

दीपोत्सव, चला मिळून करू साजरा||धृ||


धन मोठे स्वत्वाचे, ते जतन करू या,

अंतरीच्या लक्ष्मीचा सन्मान स्मरू या,


अष्टलक्ष्मीचे सुस्वागत होईल सर्व घरा,

दीपोत्सव, चला मिळून करू साजरा||१||


रामरूपी ओज जय रावणरूपी तिमिरावर,

धैर्य, शांती, क्षमेने मात होते अधीरावर, 


दिव्यतेचा दीप प्रज्वलित होईल हो सत्वरा,

दीपोत्सव, चला मिळून करू साजरा||२||


आतिषबाजी होड दिखाव्याची लागते,

धूर पैशाचा होतो, अन् प्रदूषणही वाढते, 


पशू-पक्षी घाबरती, त्या जीवांचा विचार करा,

दीपोत्सव, चला मिळून करू साजरा ||३||


रक्तदान अन् अन्नदानाची शिबिरे उभारू,

गरिबांच्या चुली पेटवू, अश्रू त्यांचे सावरू,


उत्सव पर्यावरणाचा, हा अर्थ जाणा जरा,

दीपोत्सव, चला मिळून करू साजरा||३||


Rate this content
Log in