अस्वछतेच्या बोंबा
अस्वछतेच्या बोंबा
आंनद सणाचा साजरा झाला खरा
कचर्याचा जागो जागी साचला ढिगारा
ध्वनी प्रदूषणाचा कायदा कोण पाळतो
कायदा होऊन फक्त कागदावर राहतो
वायुप्रदूषणाचे वाढले जीवघेणे प्रदूषण
आजाराने त्रस्त त्यांचे होते रे मरण
फटाकड्यानी तर कहरच केला
भयभीत होऊन लहान थोर पळाला
सरकारी रस्ते झाली यांची हो मालमत्ता
कोण त्यांना विचारेल म्हणती आम्ही कार्यकर्ता
स्वच्छतेच्या नावावर हेच राजकारण करती
खरे कार्य करण्यास कोणी नाही धजती
अस्वछ्ता करण्यास यांचे हातभार दिसती
कचऱ्याच्या नावाने हेच बोंबा मारती
नेता असतो फक्त मतांचा लाचार
सर्व काही घडले तरी म्हणतो करू नंतर विचार
