STORYMIRROR

Stifan Khawdiya

Others

3  

Stifan Khawdiya

Others

अस्थिर राजकीय परिस्थिती

अस्थिर राजकीय परिस्थिती

1 min
188

मेळ नाही कुणाला कुणाचा फक्त सत्तेसाठी 

राजकारण आहे.

सध्या महाराष्ट्रातील अस्थिर राजकीय परिस्थिती 

अतिशय लाजिरवाणी बाब आहे. 


जाती जातीचा एक पक्ष निर्माण झाला आहे. 

जात जात करून राजकारणाचा विडा भलताच रंगला आहे.

याचं रंगाची किमया मनुष्य प्राण्यामधे भिनली आहे.

अन् नेता आमच्याच जातीचा हवा आहे हे खुळ मनी

ध्यानी ठासून भरले आहे. 


हा नेता ह्या पक्षाचा,तो नेता त्या पक्षाचा,पक्ष फक्त जातीचा आहे.

अन् पक्षा मधुनच खरा मानवतेचा नाश होत आहे.

मात्र दुर्दैव जनतेला हे माहीत असूनही जनता आपली 

गप्प आहे.


इथे सत्तेच्या खुर्ची साठी नेता काहीही करणार,

वेळ आली तर एकमेकांचे मुडदे पाडणारा.

कोणत्याही एका पदासाठी प्राणपणाला लावनार,

मग जिंकलोच पाहीजे ते पण कोणत्याही प्रकारे

कारण हवी आहे फक्त सत्ता. 


किती विचित्र आहे राजकारण. 

अन् त्या पेक्षा विचित्र आहे राजकारण करणारे नेते.

फक्त धुंदी आहे त्यांना सत्तेची.

अन् राज्याचा विकास मात्र शून्य अगदिच शुन्य आहे.


ह्या लाजिरवाण्या हलकट राजकारणात नेत्यांची मात्र चांदी आहे.

कोणत्याही बाबतीत राजकारण करूण जनतेची लुटमार पदोपदी नक्की आहे. 


आश्वासनचा पाऊस राज्यात जोरदार आहे.

पण ओलावा त्याचा कोरडाच आहे.

फसवेगीरी नावाचा वावटळ क्षणाक्षणाला वाढत आहे. 

अन् राज्याची आर्थिक परिस्थिती ढासळत आहे.


बळी फासावर जावो,महागाई मुळे भूकबळी जाओ,

नैसर्गिक संकट येवो,या आई,बहिणींची अब्रू रस्त्यावर लुटली जावो.

काय कुणाला पडलयं याचं इथे सरकार अन् राजकारण अंधळा कारभार आहे.


आता लाज वाटते मदानाचा हक्क बजावतांना.    

अन् नेता लोकशाहीत निवडून देतांना. 

दाखवायचे दात वेगळे आणि खाण्याचे दात वेगळे .


सध्या राजकारणात नवीन राजकारण चालू आहे. 

राष्ट्रपतीराजवटतेच्या खाली महाराष्ट्र माझा खचणार आहे.

केव्हा जाग येईल नेत्यांना कधी अस्त होईल मानवतेचा 

घात करणाऱ्या राजकारणाचा.

का?हे असच चालू राहणार. 

अन् शेवटी,

खेड्यांनी, गावोगावी, शहरात, तालुक्यात, जिल्ह्यात 

नेत्यांची हिटलरशाही लागू होणार..


Rate this content
Log in