अष्टविनायक दर्शन...
अष्टविनायक दर्शन...
ब्रिजमोहन टूर्सतर्फे
माझी झाली निवड
अष्टविनायक दर्शनासाठी
काढली मी सवड
प्रथम दर्शन घेतले मी
महाडच्या वरद विनायकाचे
निसर्गरम्य वातावरणात
प्रस्थान या गणपतीचे
मग दर्शन घेतले
भक्त पावक बल्लाळेश्वराचे
योग्य नियोजन,सुयाेग्य स्थान
या पाली गावाचे
दुसऱ्या दिवशी गेलो
मोरगावच्या मयुरेश्वराला
भक्ताची तुफान गर्दी म्हणून
पसंती मुखदर्शनाला
त्यानंतर प्रस्थान
रांजणगावच्या महागणपतीला
आराध्यदैवत म्हणून
पुजले या गणेशाला
चिंताहारक थेऊरच्या
चिंतामणीचे घेतले दशॆन
भक्तिमय वातावरणात
झाले पावसाचे आगमन
आपली भक्ती सिद्ध
करणाऱ्या सिद्धटेकला गेलो
सिद्धिविनायकाच्या चरणी
आम्ही लीन झालो
परतीच्या प्रवासात
मग गेलो लेण्याद्रीला
पायऱ्या चढून भक्तिने
गेलो गिरीजात्मकाला
ओझरच्या श्री विघ्नेश्वर
गणपतीचे घेतले दर्शन
रात्र झाली तरीही
टिकले उत्साहाचे वातावरण
नियोजनपूर्वक स्थळदर्शनाने
झाली यात्रेची सांगता
अष्टविनायक यात्रेची
हीच तर खरी महानता
