STORYMIRROR

Kalpana Nimbokar

Others

4  

Kalpana Nimbokar

Others

असेच एकदा

असेच एकदा

1 min
298

असेच एकदा आभाळलेल्या

तुझ्या आठवणी आल्या दारी

मी म्हणालो हळुच त्यांना

निघुन जा, इथुन मी नाही घरी ||1||


त्यांना परतवुन लावने

या मनाला शक्य नव्हते

आभाळलेल्या त्या माझ्या नजरेत

माझे मलाच अप्रृप होते ||2||


भास होता आठवणीचा

निराशेचा डोह आला भरुन

मुक स्वप्नाच्या या राज्यावर

स्वप्न मंजुषा गेली विरुन ||3||


तुला विसरणे कदापि

शक्य नव्हते मला

पण....आठववणीही नको

माझ्या ,...तुझ्या आसऱ्याला ||4||


Rate this content
Log in