STORYMIRROR

Varsha Shidore

Others

4  

Varsha Shidore

Others

असावं कोणीतरी ....

असावं कोणीतरी ....

1 min
612

असावं कोणी ज्याला दिसणं नाही मन कळावं 

असावं कोणी जे आपलं प्रेम नसलं 

तरी मैत्री असावी आयुष्यभर घट्ट 

असावं कोणी ज्याला नकळत सगळं 

नाही कळालं तरी सांगेल ते कळावं 

असावं कोणी ज्याला कधी रडताही यावं 

अन त्याला हसवायचं भाग्य लाभावं 

असावं कोणी ज्याला आपलं बनवणं नाही झालं 

तरी आयुष्यभर जपता यावं 

असावं कोणी ज्याच्याकडे मन मोकळं करता येईल 

असावं कोणी ज्याला अलगद बिलगून रडता येईल 

असावं कोणी ज्याचं मन सहज वाचता येईल 

असावं कोणी ज्याला आपलं म्हणता येईल 

असावं कोणी ज्याच्यापासून दुःख लपणार नाही 

असावं कोणी ज्याला समजून घेता येईल 


Rate this content
Log in