STORYMIRROR

Jyoti gosavi

Others

3  

Jyoti gosavi

Others

असा झिम्माड पाऊस

असा झिम्माड पाऊस

1 min
291

पावसाचा थेंब

झिरपला आत आत

आता उगवलं कोंब

धरित्रीच्या उदरात


पावसाचा थेंब

जसा टपोरा मोती

बिजलीचा ताशा

वाऱ्याचा सूर साथी


भेगाळल्या भुईने 

टाकला हुंकार

बिजलीची रुद्रवीणा

आणि पावसाचा झंकार 


कधी तळ्यात कधी मळ्यात

कधी बरसला डोळ्यात

आस प्रियाच्या येण्याची

जागविली सारी रात


असा झिम्माड पाऊस

असे ओलेते अंगण

सय आली राजसाची

गेले कोमेजून मन


पावसाचा धुंद गंध

रातराणी मंद मंद

नभ झाले कुंद कुंद

तुझ्या प्रीतीचा छंद


पावसाची सर चिंब

गेली माळून मोगरा 

भिजलेले अंग अंग

देह झाला लाजरा


पावसाची सर चिंब

मी राधा मीच श्रीरंग

चढला प्रेमाचा रंग

मनमोर बावरा



Rate this content
Log in