STORYMIRROR

Vijay Bikkad

Others

4  

Vijay Bikkad

Others

अस काही असावं

अस काही असावं

1 min
154

असं काही असावं

तुझ्या माझ्या मैत्रीचं

जसं अतूट नातं असतं

 फुल आणि फुलपाखराचं

 

जसं नीरव बंधन। असतं

 चंद्राचं आणि चांदण्याचं

 तसंच काही असावं

 तुझ्या माझ्या मैत्रीचं


 अबोल वात्सल्य असतं

 गाईशी वासराचं

 निरागसत्व असतं

 इतरांशी चिमुकल्याचं

 तसंच काही असावं

 तुझ्या माझ्या मैत्रीचं


 जसं प्रेम होतं

 लैला मजनूचं

 गरीब-श्रीमंत काही नसावं

 मित्रत्व कृष्ण सुदामाचं

 तसंच काही असावं

 तुझ्या माझ्या मैत्रीचं


இந்த உள்ளடக்கத்தை மதிப்பிடவும்
உள்நுழை