अस काही असावं मैत्रीचं
अस काही असावं मैत्रीचं
1 min
315
अस काही असाव तुझ्या माझ्या मैत्रिचं..
जसं अतुट नातं असतं
फुल आणि फुलपाखराचं
जसं नीरव बंधन। असतं
चंद्राच आणि चांदण्याचं
तसचं काही असावं
तुझ्या माझ्या मैत्रिचं
अबोल वात्सल्यं असतं
गाईशी वासराचं..
निरागसत्व असतं
इतरांशी चिमुकल्याचं
तसचं काही असावं
तुझ्या माझ्या मैत्रिचं
जसं प्रेम होतं
लैला मजनूचं
गरीब-श्नीमंत काही नसावं
मित्रत्व क्रुष्ण सुदामाचं
तसचं काही असावं
तुझ्या माझ्या मैत्रिचं
