अर्थ जीवनाला...
अर्थ जीवनाला...
वेलीस या बघ बहर नवा आला,
घालतसे साद पुष्प परागाला.
विसरू नको रे आपुल्या प्रीतीला.
तुजविन नसे अर्थ जीवनाला..... ||धृ ||
भास नव्हे ध्यास यावे तू भेटीला,
हिरवा शालू तुझ्यासवे घातला .
कुंतली गजरा मोदे मी माळला ,
भाव घे रे जाणून नयनातला ..॥ १ ॥
दरवळ सुटे स्नेह मोहराला.
असशील तेथून यावे भेटीला.
स्मरुनी मनी आपुल्या वचनाला.
दे उजाळा पूर्व स्मृती दलाला..॥ २॥
बोलाविताच नि:संकोच तू यावे ,
स्पर्शे यावा आरक्तपणा गालाला .
प्रेमरसाते ओथंबून स्त्रवावे,
मोदही मिळावा आसक्त मनाला..॥ ३ ॥
तू येताच ऋतूराजही सजला.
मुग्ध सरीने रोमांच मत्मनाला .
धुंद मिलनी एकरूप आत्मा झाला,
दिला अर्थ तूची मम जीवनाला. ॥ ४ ॥
