अर्पण
अर्पण
1 min
340
विशाल नयन , भस्म कपाळी
निलकंठेश्वर तू या जगाचा
हाती त्रिशुल , कंठी सर्पमाला
अर्धनारीश्वर तू सुरेख शोभला
दुग्ध - जलाचा अभिषेक जयाला
शुभ्र फुले , बिल्वपत्रांनी सजला
लिंगरूप हे भव्य अनादी
देवांचा देव तू महादेवा
हिमालयात समाधी लागते
नंदी ही वाहन बनला
रूद्रभूमीत वास्तव्य तुझे
योगी तू , तूच सृष्टीकर्ता
अर्पण करिते मी सर्वस्व माझे
चरणी तुझ्या हे शिवशंकरा
दुष्ट प्रवृत्तीचा विनाश होवो
ठेव कृपादृष्टी तू भक्तांवर सदा