अर्ध्यात तू सोडून गेलास
अर्ध्यात तू सोडून गेलास
1 min
982
(जेव्हा एखादा लेकरू सोडून जातो तेव्हा)
दवाखान्यात पाऊल ठेवतात
मनाची अवस्था मला कळली
सगळ्यांची धावपळ बघून
माझ्या मनाची शांती हरवली
निपचित पडून आयसीयूमध्ये होतास
आई वडीलांची अवस्था बघून
स्तब्ध सगळे अचंभित झाले
चाहूल आईची लागताच
एकदा तरी तू बघायचं होतं
ओठावर हसू आणून
आईच्या मनाच सात्वन तू करायचं होतं
हृदयाचे ठोके तुझे थांबताच
अश्रूंच्या पुरामध्ये सगळे वाहून गेले
टाकून तू सगळ्यांना गेला
आठवणी मागे सोडून गेला
