STORYMIRROR

नासा ( NaSa ) येवतीकर

Others

3  

नासा ( NaSa ) येवतीकर

Others

अर्धांगिनी

अर्धांगिनी

1 min
284

जीवनात स्वप्न होतील पूर्ण त्यासाठी गरजेची आहे पत्नी

घराला घरपण पूर्ण करते सुखदु:खांची सोबती अर्धांगिनी


तिच्यासोबत जुळले सूत सार्थक झाले जीवनी

प्रत्येक क्षणात साथ देते ती माझी अर्धांगिनी


लेकरे व घर सांभाळते किती ही त्रास सोसुनी

चेहरा सदा हसरा ठेवी ती माझी अर्धांगिनी


परघराची लाडकी लेक मानते मला ती धनी

इज्जतीची पर्वा करते ती माझी अर्धांगिनी


Rate this content
Log in