अपेक्षा
अपेक्षा
1 min
373
अपेक्षांचा डोंगर हा
नकळतच वाढतो
काही अपुर्ण इच्छांना
दुःखात मग माळतो........
अपेक्षा कुणाकडून
करत राहत मन
हरवून बसे हास्याचं
खर अनमोल धन..........
असाच का हा वागतो ?
तिने प्रेमाने बोलावे!
अशा अनेक प्रश्नात
वृथा जीवाने गुंतावे !........
अपेक्षांचा डोंगर हा
रचूच नये शक्यतो
कोण कधी साथ देई ?
कोण शब्दास जागतो ?.......
आपलं काम कराव
योग्य असच वागाव
स्वबळाने जगतांना
कुणा का काही मागाव......
