"अन्याया विरुद्ध लढा"
"अन्याया विरुद्ध लढा"
1 min
562
कोणीतरी म्हटलंय
अन्याया विरुद्ध लढा
पण कस लढा?
बायका-पोरांची काळजी वाटते
घर-दाराची चिंता असते
भविष्याची फिकीर सतावते
तरी पण लढावे लागेल
एखाद्या सैनिकासारखे
एक सैनिक विचार करत नाही
सीमेवर लढतांना आपल्या शत्रूसोबत
आपल्या बायका पोरांचा, घरादाराचा, किंवा भविष्याचा
तो लढतो आपल्या देशासाठी, मातृभूमीसाठी, तिरंग्यासाठी
आपल्यालाही तसेच करावे लागेल
जर अंतर्गत अन्यायाविरुद्धची लढाई जिंकायची असेल
मातृभूमीच्या ऋणातून मुक्त व्हायचं असेल
आंणि देशाला वैभवशाली बनवायचं असेल
