STORYMIRROR

Savita Jadhav

Others

4  

Savita Jadhav

Others

अंतिम सत्य

अंतिम सत्य

1 min
510

नातं....

आईचं लेकराशी...

पिलाचे पाखराशी...

आयुष्य भराचे अतुट बंधन असते.

आणि तसेच अतुट असतं नातं...

मित्रांच्या मैत्रीचे.


नातं असतं रक्ताचं

नातं असतं प्रेमाचं...

नातं असतं आपुलकीचं...

नातं असतं माणुसकीचं.


नातं हे जपायचं असतं..

नातेपण टिकवायचं असतं.

नातं कोणतंही असो...

प्रेमरूपी सिंचनानं फुलवायचं असतं.


असं सगळेच वागले तर किती होईल स्तुत्य..

मला तर बाई हेच वाटते अंतिम सत्य.

माणसाचा जन्म, म्रुत्यु आहेच अंतिम सत्य.

पण हा विचार करून कशाला जीवन करावे व्यर्थ


साहित्याला गुण द्या
लॉग इन