STORYMIRROR

Neha Ranalkar(Nawate)

Others

4  

Neha Ranalkar(Nawate)

Others

अन्न हे पूर्ण ब्रह्म जाणिजे..

अन्न हे पूर्ण ब्रह्म जाणिजे..

1 min
441

का ढेकर देऊनी घालवीशी ताटातील ते वाया?!

जरी दिले रे देवानं तुज मुबलक अन्न खावया!!१


कुणी भटकती दारोदार ग्रास मुखी तो पडाया!

लेऊनी लक्तरे गरिबीची ती जरी ग्रासली काया!!२


कुणी उदास देती कुणाचे हात अखडती द्याया!

पंगती वर पंगती ऊठूनी कित्येक जाई ते वाया!!३


दारी ताटकळले दारिद्र्य घेऊनी अशक्त काया!

तु नित्य सेवी सुग्रास रोज अन्न घालवी वाया!!४


बघ राहुन कधी उपाशी ते दु:ख त्यांचे कळाया!

कुणी घेती फास चंदनापरी रे झिजवली काया!!५


किती राबले ते हात शेतात हे धान्य पिकवाया!

बघ तु श्रमूनी ऊन्हात किंमत त्यांची कळाया!!६


उदर भरता तुझे यज्ञ कर्म होते का विसराया ?!

पुर्ण ब्रम्ह ते असता ही घालवितो तु का वाया ?!!७


मागणं देवास देई सर्वांस पर्याप्त तितुके खाया!

नको न्युन वा नको अधिक जाई रे जे वाया!!८


सुखी ठेवी तु अन्नदाता राहु दे कृपेची छाया!

कुणी नको उपाशी नको कुणी भुकेला मराया!!९


Rate this content
Log in