अंगणामध्ये जाेडी बैलाची....
अंगणामध्ये जाेडी बैलाची....
1 min
145
अंगणामध्ये जाेडी बैलाची
आवर्जून बैलपोळ्याला यायची,
दाखवायचाे नैवेद्य पुरणपोळी
आई साजूक तूप वाढायची
अंगणामध्ये जाेडी बैलाची
नाविन्यतेने आम्ही सजवायचाे,
या सजाॆराजाला आम्ही
मंदिराभोवती प्रदक्षिणा घालायचाे
अंगणामध्ये जाेडी बैलाची
झूल आम्ही चढवायचाे,
गळ्यात माळा, हार, फुगे
तुलनेने त्यांना सजवायचाे
अंगणामध्ये जाेडी बैलाची
कृतज्ञता आम्ही दाखवायचाे,
वर्षभर राब राब राबायचे
बैलपोळा खास रंगवायचाे
