अंगण
अंगण
1 min
245
छोटेसे अंगण असावे सुंदर
सुंदर रांगोळी रेखाटावी समोर
छोटी मोठी झाडे लावावी
फुले पानांनी बाग सजवावी
अंगणात एक तुळशी असावी
सकाळ संध्याकाळी दिव्यांनी तेवावी
पण अंगणाची जागा बाल्कनीने घेतली
घराची जागा फ्लॅट नी घेतली
शहरात अंगण झाले लुप्त
समाजापासून माणूस झाला अलिप्त
