STORYMIRROR

Tukaram Biradar

Others

3  

Tukaram Biradar

Others

अंधश्रद्धा

अंधश्रद्धा

1 min
264

मंदिराचे कळस गगनाला भिडले,

शाळेचे बांधकाम देणगी वाचून राहीले,

दुधाचा अभिषेक दगडाच्या देवाला,

शालेय पोषण आहार नुकताच नावाला,


देवाचा दरवाजा चांदीने मढला,

शाळेचा दरवाजा पाण्याने सडला,

मंदिरातील झुंबराला हिऱ्या-मोत्याची खडे,

शाळेच्या भिंतीला पडू लागले तडे,

मंदिरात जाऊन लोक पोथी-पुराण वाचतात,

शाळेतील ग्रंथालयात उंदीर ममा नाचतात,


मंदिरातील दानपेटीत गुप्त दान करतात,

शाळेच्या देतगीची पावतीची पावतीची मागतात,

दर वर्षाला देवाची भरवतात यात्रा,

पालक मेळाव्याला फक्त पालकच सतरा,

पुजाऱ्याच्या गळ्यात सोन्या-चांदीचे हार,

कंत्राटी शिक्षकांची होऊ लागली उपासमार,


न खाणाऱ्या देवाला पंचपक्वानाचा घास,

शाळेत खिचडी-भाताचा येईना वास,

आता तुम्ही शिकलेले तरुण-तरुणी करु लागले उपवास

चांगले सांगा कधी संपेल इथला अंधविश्वास, 


साहित्याला गुण द्या
लॉग इन