अंधश्रद्धा
अंधश्रद्धा
1 min
215
इंद्राची पूजा करून काय मिळणार
गोवर्धन पर्वत आपले रक्षण करणार
म्हणून पूजा गोवर्धनचीच करा तोच तारणार
हे सांगतात खुद्द कृष्ण भगवान
निसर्गाची पूजा आणि त्याचे रक्षण
हेच आपले कर्तव्य प्रथम
कर्ज काढून नका करू सण
सांगतात हे संत श्रेष्ठ गाडगे महाराज पण
मुलांचे शिक्षण हेच कर्तव्य प्रथम
थोतांड आहे अंधश्रद्धा
निसर्गावर ठेवा श्रद्धा
निसर्गच तारेल सर्व आपदा
