STORYMIRROR

Savita Kale

Others

4  

Savita Kale

Others

अंधश्रद्धा

अंधश्रद्धा

1 min
2.1K

बकरं-बोकड कापलं तरी

देव काही पावनां

उपास-तापास सारं केलं

सुख कुठं घावनां ।। १।।

फुकून अंगारे-धुपारे

रोग बरे होइना

भोंदू बाबांचे मात्र फावते

समजून कुणी घेईनां ।। २।।

ज्याला खरी तहान

दूध त्याला मिळनां

घागरी ओतून दगडावरी

थेंबसुध्दा गिळनां ।। ३।।

सिग्नलला बघून ही

माणूस तिथं थांबनां

मांजर आडवं गेल्यावर

पुढे तो जाईनां ।। ४।।

लिंबू मिरच्य लावल्या

नजर नको लागण्या

तरी होती अपघात

टळेना दुर्घटना ।। ५।।

सत्य खरे यामागे

कारण घ्या जाणुनी

विज्ञानाची कास धरा

अंधश्रद्धा पळवुनी ।। ६।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन