STORYMIRROR

Mahesh Raikhelkar

Others

4  

Mahesh Raikhelkar

Others

"अंधळेपणा"

"अंधळेपणा"

1 min
240

मांजर आडवे गेले कि म्हणे काम होत नाही !

काय तुझ्या कर्तृत्वावर तुझा विश्वास नाही !!


मुलगा म्हणे असतो वंशाचा दिवा !

मुलीनेच दोन कुळाचा उद्धार करावा !!


गणपती विसर्जन नद्या,तलावातच करणार !

पर्यावरणाचा बरे कोण विचार करणार !!


म्हणे तिच्या-त्याच्या अंगात देवी येते !

खरे तर मानसीक आजाराने तो-ती पीडित असते !!


नवस-सायासाने म्हणे मुले होतात !

वैद्यकीय उपचार काय बिनकामाचे असतात !!


देवी-देवतांसमोर पशु-पक्षांचा बळी दिला जातो !

आपल्याच निर्मितीचा बळी घेऊन देव कसा खुष होतो !!


विधवा महिला म्हणे अपशकुनी असते !

नव-याचे मरण काय तिच्या हातात असते !!


सोडा सकळ- जनहो सोडा  अंधश्रद्धा !

विज्ञान, श्रम,  कर्तृत्वावर ठेवा तुम्ही श्रद्धा !!!



Rate this content
Log in