अंधार दूर सरूनी
अंधार दूर सरूनी
अंधार दूर सरूनी प्रकाशी तेज नगरी
रस्ते सारे उजलुनी आनंद लहरी गगनी
लक्ष दीप लावले काळोख जलण्या सारे
धुंद दारी येऊनी कुठूनसा येई वारा
शोभे आकाशकंदील उंचावरी टांगला
सडा समार्जन दारी करी तोरण बांधले दारी
अभ्यंग स्नान पहाटे करुनी सुगंधी उटणे लावे अंगी
पहाटे तप्त पाणी घेऊनी चढते धुंदी न्यारी
बोचरी थंडी ही गुलाबी फुलवितो रोमांच अंगी
दारामध्ये काढुनी रांगोळी रंगुनी रंग सारे
रोषणाई ही खरोखर दिपोस्तवाचा प्राण हा
सोन किरणे ही शुभशकूनी नाश करते दानवांचा
फराळ हा दिवाळीचा गोड खऱ्या पकवानांचा
वाढवी गोडी सणाची मित्र आप्तेष्टांच्या मेळा
कशी वर्णू मी ही दिवाळी परमोच्च सोहळा हा
मनुष्याच्या संगतीने ही वाट पाही देवदेविका
भोवताली जी भुकेलेले पोरके असती किती
त्यांनाही वाटू आनंद तुम्हा करते मी विनंती
