STORYMIRROR

नासा ( NaSa ) येवतीकर

Others

3  

नासा ( NaSa ) येवतीकर

Others

अनभिज्ञ

अनभिज्ञ

1 min
211

वातावरण माहीत असूनही 

बाहेर का फिरतो आहे ?

माझे मलाच कळेना मी

असा का करतो आहे ?


टीव्हीवरील दृश्य पाहून

छाती धडधड करत आहे

लोकं किड्या मुंग्याप्रमाणे

कोरोना रोगाने मरत आहे


लोकांमध्ये पसरणारा हा रोग

पाहा कसा वेगात पळत आहे

जनता अजूनही गंभीर नाही

म्हणून तर रुग्ण वाढत आहे


उठा जागे व्हा काळजी घ्या जरा

एक चूकही महाग पडत आहे

या काळात बाहेर जाणे टाळावे

घरात बसणे हेच सुरक्षित आहे


Rate this content
Log in