अनामिक ओढ....!
अनामिक ओढ....!
मला तुला खुप काही सांगायचे होते...
मला तुझ्याशी खुप-खुप बोलायचे होते...।।
कदाचित माझे बोलणे अर्थहीन असेलही...
तुझ्या लेखी ते महत्वाचे नसेलही.... ।।
माझे मन मला मात्र.....
मोकळे तुझ्यापाशीच करायचे होते...!
तुच तर दिला होतास मला तो हक्क.....
तुच तर दाखविली होतीस मला ती आस...
तुच तर म्हणाला होतास,
मी तुझ्यासाठी आहे... खास....।।
खरंतर,....
मला तुझ्यापुढे खुप लहान व्हायचे होते...
तुझ्याशी दंगा मस्ती करुन खेळायचे होते...।।
खुप वर्ष झाले रे....
मला लहान होऊन.....
मलाही कंटाळा आला आहे रे... मोठे राहुन ।।
खुप आनंद झाला होता मला....
तु माझा झाल्याचा....।।
आनंदाचा क्षण होता तो....
तु माझ्या आयुष्यात आल्याचा ...।।
मनात मी बांधले आहेत....
तुझ्या स्वप्नांचे अनेक मनोरे....।।
जरी तू प्रत्यक्षात भेटलास कधी.....
तरी क्षणभरात कसे रे...उतरेल हे सारे........?
