STORYMIRROR

नासा ( NaSa ) येवतीकर

Others

3  

नासा ( NaSa ) येवतीकर

Others

अमूल्य वोट

अमूल्य वोट

1 min
240

अमूल्य आहे तुझे वोट


घेऊ नको तू कोरी नोट

अमूल्य आहे तुझे वोट


लोकशाही करण्या भक्कम

बघू नको तू रक्कम

नंतर मिळेल तुला चोट

अमूल्य आहे तुझे वोट


जाणून घे मताची शान

श्रेष्ठ आहे मतदान

शाईचे दाखव तू बोट

अमूल्य आहे तुझे वोट


सर्वांना तू सोबत घे

मतदान केंद्रावर ने

देण्या लोकशाहीचे घोट

अमूल्य आहे तुझे वोट


जरा ठेव आपले भान

हक्क व कर्तव्याची जाण

समाधानाने भरेल पोट

अमूल्य आहे तुझे वोट


कवी नासा सांगतो सार

मतदानाचा करा विचार

कुठे लावू नका गालबोट

अमूल्य आहे तुझे वोट



Rate this content
Log in