STORYMIRROR

Ramkrishna Nagargoje

Others

4  

Ramkrishna Nagargoje

Others

अमरावती

अमरावती

1 min
334

रस्त्यावरची गर्द झाडी,

आणि पळते आगीनगाडी,

पुणे सोडून पुढे धावते,

ही मस्त आगीनगाडी


स्टेशन मागून स्टेशन जाते,

आली अमरावती,

पुढेपुढे धावत पळते,

आली बघा नागपूरची संत्री,


उंच झाडी अन् वृक्ष किती,

धावते विदर्भराणी,

चंद्रपूरचे जंगल आले,

येथे वाघांची छावणी


भरभर गाडी पळते,

ही भोपाळची राणी,

तळे तळ्यात भोपाळ सारे,

पहा लेक सिटी


आगीनगाडी पळत जाते,

लखनौ नवाबसिटी,

चलाचला पुढे जाऊ,

पंजाबचा गहू पाहू

सुवर्णमंदिर, अमृतसर,

सरदारजी आमुचे


दिल्ली आग्रा सारे येथे,

उत्तर भारत, हिमाचलाच्या,

रांगा येथे, उत्तराखंड सारा पहा,

हा जम्मूकाश्मीर, नंदनवन हे

सारे भारतवासी


उंच उंच शिखरे किती,

पहा हिमालयाची उंची,

शुभ्र पांढरा बर्फ सारा,

हिमालयाची उंच शिखरे,

बदरी केदार पहा जरा,

दर्शन घेऊ चला पुढे


सीमा राखतो आमची सारी,

ही हिमालयाची उंची

पोलादी याची छाती,

सुजलाम सुफलाम भारत सारा,

मस्त मस्त सैर त्याची


Rate this content
Log in