STORYMIRROR

JYOTI GOLE

Others

4  

JYOTI GOLE

Others

अलिप्त

अलिप्त

1 min
375

मी सर्वांमध्ये मिळून मिसळून

राहाणारी तरीही अलिप्त

सर्व रंगांमध्ये मिसळूनही

रंग माझा वेगळा म्हणत

स्वतःचे अस्तित्व जपणारी


राहावेच लागते असे कारण

माझ्या मिसळण्याचा अर्थच

वेगळा घेतला जातो


जपावे लागते मला माझे

अस्तित्व या बेरकी दुनियेत


नाहीतर सर्वच येतील हक्क

सांगायला आणि माझी मी

अशी उरणारच नाही


साहित्याला गुण द्या
लॉग इन