अलौकिक
अलौकिक
1 min
166
अक्कलकोटचा राणा अजन्मा अजानुबाहू जाणा
आयुष्याचा ताणा बाणा सुटणे तिढा सहज माना
अंगीकारा वटवृक्षाचा निर्विकल्प तो भक्ती बाणा
नको मोह अहंकार भक्तांतरी जपा आचरणा
वाचा मने निर्विष जवळ नित्य स्वामीस पहा ना
रूपे धारिती परीक्षा पहावया भक्त सिद्ध होण्या
गर्वहरण श्रीमंतीचे कधी भक्तीचे स्वामी वाणा
नका भिऊ अभय हस्त स्वामींचा सदैव रक्षणा
पूजा अर्चनेचा नसे कसलाही काटेकोरपणा
साधी भोळी भक्ती अंतरी तिथेच स्वामी असे ठाणा
देई प्रचिती निस्सीम भक्ताच्या अरिष्ट निवारणा
नको ढोंग पाखंडीचे हवी स्वामी शरण धारणा
